Posts

१८०० चा हिशोब, जगण्याची धडपड, अनभिद्न्यता आणि आपण!

१८०० चा हिशोब,  जगण्याची धडपड, अनभिद्न्यता आणि आपण!  १८०० चा हिशोब मागणाऱ्या काकू बघितल्या आणि अगदी पहिली प्रतिक्रिया हि होती कि यात खरंच एवढं हसण्यासारखं काय आहे? एक बाई आपल्या मेहेनतीचे पैसे मागत आहे (जस आपणहि न कळल्यास मागत असताना, मागतो/ फील करतो/ करू शकतो ...?) आणि समजवणारे तिला समजवत आहेत (तेही शूट करून?) नंतर यावर हसणारे लोक हि पहिले आणि दया आली कि आज खरंच इंटरनेट नसते तर काय झालं असत...? आपण करमणूक च  कशी केली असती ? मग ती दुसऱ्याची फजिती बघून का होईना! हो ना? असो.  मग तोही विषय जुना झाला आणि मग झोपेतून जाग झाल्यासारखं लोक म्हणायला करायला लागले कि अरे हे तर ट्रॉलिंग आहे हे थांबवले पाहिजे! इतपत ठीक आहे पण त्यावर सुद्धा तुमच्या आमच्या सारखे सुजाण, सुखी, किंवा विशेषाधिकार असणारे वगैरे असे, म्हणायला लागले कि काहीही नाव (भली मोठी / टेक्निकल ) नावं का देत आहात ?, ट्रोलिंग कुठेय ? कित्ती इनोसन्स आहे यात ? किंवा इतक कळत नाही का?, हिशोब स्वतःला येत नाही तर दुसर्याकडून मोजून का नाही घेतले?, १८०० च तर होते ना?, ती मुलं तर इंनोसंटली हे करत आहेत...वगैरे ! कित्ती छान म्हणजे हिशोब आज ना उद्या