१८०० चा हिशोब, जगण्याची धडपड, अनभिद्न्यता आणि आपण!

१८०० चा हिशोब,  जगण्याची धडपड, अनभिद्न्यता आणि आपण! 

१८०० चा हिशोब मागणाऱ्या काकू बघितल्या आणि अगदी पहिली प्रतिक्रिया हि होती कि यात खरंच एवढं हसण्यासारखं काय आहे? एक बाई आपल्या मेहेनतीचे पैसे मागत आहे (जस आपणहि न कळल्यास मागत असताना, मागतो/ फील करतो/ करू शकतो ...?) आणि समजवणारे तिला समजवत आहेत (तेही शूट करून?) नंतर यावर हसणारे लोक हि पहिले आणि दया आली कि आज खरंच इंटरनेट नसते तर काय झालं असत...? आपण करमणूक च  कशी केली असती ? मग ती दुसऱ्याची फजिती बघून का होईना! हो ना? असो. 

मग तोही विषय जुना झाला आणि मग झोपेतून जाग झाल्यासारखं लोक म्हणायला करायला लागले कि अरे हे तर ट्रॉलिंग आहे हे थांबवले पाहिजे! इतपत ठीक आहे पण त्यावर सुद्धा तुमच्या आमच्या सारखे सुजाण, सुखी, किंवा विशेषाधिकार असणारे वगैरे असे, म्हणायला लागले कि काहीही नाव (भली मोठी / टेक्निकल ) नावं का देत आहात ?, ट्रोलिंग कुठेय ? कित्ती इनोसन्स आहे यात ? किंवा इतक कळत नाही का?, हिशोब स्वतःला येत नाही तर दुसर्याकडून मोजून का नाही घेतले?, १८०० च तर होते ना?, ती मुलं तर इंनोसंटली हे करत आहेत...वगैरे ! कित्ती छान म्हणजे हिशोब आज ना उद्या तिला येईल तेव्हा किंवा तिथपर्यंत ती पोहोचेल पण तोपर्यँत हे तिचे प्रयत्न सुद्धा आपल्याला किती विनोदी वाटतात.. हो ना? तेवढे पेशन्स कुठेत ? आणि कशाला हवते? यावर हस किंवा नको हसू ... हे विनोदी च वाटायला हव ! त्रास कसला व्हावा आणि कशाला ? अजून फॉरवर्ड करत राहू मग भले ते चूक आहे असं म्हणून का असेना ! आपल्याला एक नागरिक म्हणून आपले सांविधानिक हक्क माहित नाही आणी आपण दुसऱ्याचे हक्क जपतहि नाही (यात कसले आले नागरिक हक्क?) ...तर बाई म्हणून तर कसे माहित असणार ? आणि असले तरीही हे विनोदी वाटणार (...?) 

मुळात हा व्हिडीओ तुमच्या आमच्या सारख्यानीच वायरल केलाय, सगळेच जण दात काढून यावंर हसले देखील.एक सांगते हे डीफेमेशन आहे आणि हे ओफेन्सिव्ह क्राईम मध्ये मोडत.

हो! आज तुमच्या माझ्या सारख्या सुशिक्षित बाई ला असं कुणीही वागवले जरी असत तर आपण कलम लावली असती....नाही पण आपल्यावर कशी येणार परिस्थिती ? आणि काहीही परिस्थिती असली तरीही कुणीही कुणाची कुठल्याही पद्धतीने धिंड का काढावी ? आणि हे कितपत योग्य आहे? फनी , वायरल व्हिडीओज ची आवड म्हणून आपण अजून किती खालच्या थराला जाणार आहोत ? का हि एकमेव करमणूक सध्या आपल्या कडे आहे? तुम्हाला खूप मनापासून असं बोलावसं वाटेल कि अरे .... अरे....  ती मुलं तिला समजावत आहेत ग नम्रता ...बघ ना नीट बघ ... आपण असं समजावतो आजकाल? कि समजवून सांगण्याची आपली शक्ती,समज संपलीय? कि आपण पुढच्या पिढीला ला हे दाखवतोय "असं समजावून सांगतात, आणि हो रेकार्ड करायला विसरू नकोस "!  कि समोरच्याला कळत नाहीय हेच आपल्याला एन्जॉय करायचं असत?  तिला माहित तरी होत का तीच हे हिशोब मागण शूट होतंय? सांगितलं होत? का सांगायचं तर तुम्ही पैसे दिले आहेत म्हणून ?, कि ती घरकाम करणारी बाई आहे तिच्या कडून कसली कन्सेंट (नम्रता प्लिज हा ) मागायचं? 

९ वर्षांपूर्वीची 'मी' आज 'ती' नाहीये, मी हि शिकले! आपण सगळेच शिकतो ना? आणि हे छातीठोक काय सांगायचं ? आणि या प्रवासात तुमच्या च जवळच्यांचीच फरफट होते...  माहित नाही काकूं जवळ कदाचित कोण आणि किती जवळचे असतील ? नवरा, मुलं काही काही माहित नव्हतं किंवा नसेल, हो पण "त्यांना १८०० चा हिशोब येत नाही हे जर शूट केलं तर इतरांना फनी 'वाटूच' शकेल"! हा त्यांचा आत्मविश्वास होता आपण सार्थ केला. आपण नाही सर्रास आपल्या आई वडिलांना, बायकोला (प्रेमाने) म्हणतोच कि तुला काय अक्कल आहे?, तुला काय कळत? हीच हि वृत्ती आहे का? असावी का? असू शकेल का? 

करोडो रुपये, ३०हजार करोड, ५हजार करोड...  आणि अजून काही करोड ज्यात किती शून्य असू शकतील हा अंदाज हि येणार नाही अश्या रकमांचा घोळ देशात (आजही) होत असताना किती जण नागरिक म्हणून त्याचा हिशोब मागतात ? (माहित तर असला पाहिजे.....आणि माहित असला तरीही ? ) कशाला मागतील ? अजून आम्ही खुश आहोत असे व्हिडीओज बघण्यात ! वायरल करण्यात ! डीफेम करण्यात ! 

नम्रता चांदवडकर भागवत 

कौन्सेलिंग सायकॉलॉजिस्ट 


Comments